विवाहितेने केली गळफास घेऊन आत्महत्या,तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-चारीत्र्याचा संशय घेऊन विवाहितेचा छळ केला जात होता. याच छळाला कंटाळून आरोळे वस्ती येथील विवाहिता मालन परशुराम लोखंडे हीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच विवाहित महीलेच्या माहेर कडील लोकांनी जामखेड पोलीस स्टेशन समोर गर्दी करीत जोपर्यंत सासरकडील लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार असा पवित्रा घेतला होता. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन सासरकडील नवरा व सासू सासरा अशा तीन जणांविरोधात आत्महत्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील आरोळे वस्ती या ठिकाणी सासरी नांदत आसलेल्या विवाहितेचा छळ आरोपी नवरा परशुराम यादव लोखंडे, सासरे यादव लोखंडे व सासु ताई यादव लोखंडे रा.आरोळे वस्ती जामखेड तालुका जामखेड हे तीघे मिळुन करीत असत. तु दिसायला चांगली नाही, तुला घरातील कामे नीट येत नाहीत, तुला स्वयंपाक येत नाही असे म्हणून वारंवार तीचा छळ केला जात होता. तसेच नवरा देखील तीच्या चारीत्र्यावर संशय घेत असे व मारहाण करीत.

याच मारहाण व छळाला कंटाळून विवाहिता मालन परशुराम लोखंडे हीने दि ३० नोव्हेंबर रोजी आपल्या रहात्या घरातील छताला गळफास घेतला. तीला जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच तीचा दि ६ डीसेंबर रोजी मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच विवाहित महीलेच्या करमाळा तालुक्यातील देवळाली येथील नातेवाईकांनी जामखेड येथील पोलीस स्टेशनला मोठी गर्दी केली. तसेच जो पर्यंत नवर्‍यासह सासु सासर्‍यांसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला.

त्यामुळे पोलिसांन समोर मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर नव्यानेच आलेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मध्यस्थीने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. मयत विवाहितेचा भाऊ संतोष ताया शिंदे रा. देवळाली तालुका करमाळा जिल्हा सोलापुर याने दिलेल्या फिर्यादीवरून वरील सासु, सासरा व नवर्‍यासह तीघा जणांनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24