Maruti कंपनीच्या वाहनांची क्रेझ जबरदस्त दिसत आहे. मार्केटमध्ये ही वाहने जास्त विकली जात आहेत. दरम्यान मारुतीने जानेवारीत आपल्या कारच्या किमती वाढवण्याबाबत घोषणा केली होती. त्यामुळे जानेवारीत मारुतीच्या कारच्या किमती वाढतील. परंतु त्याआधीच मारुतीने डिसेम्बर महिन्यासाठी एक खास स्कीम सुरु केली आहे.
या स्कीम अंतर्गत तुम्हाला मारुतीच्या सर्वात फेमस कार Maruti Celerio व Eeco या दोन कार वर खूप मोठा डिस्काउंट मिळत आहे. यसोबतच अनेक कार वर मोठा डिस्काउंट मिळत आहे. Maruti Celerio वर कंपनी जवळपास 70,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट येत आहे. सोबतच मारुती Eeco वर 35,000 रुपयांची सूट जाहीर केली आहे. यासोबतच अनेक कार वर देखील हजारोंचा डिस्काउंट आहे.
ही सूट मिळतेच सोबतच अनेक डीलरशिप त्यांच्याकडून काही गिफ्ट देखील देत आहेत. म्हणजेच मारुती कार चाहत्यांसाठी अर्थात ज्यांना मारुतीची कार घ्यायची आहे अशा लोकांसाठी खुशखबर आहे. चला याबाबत सविस्तर जाणून घेऊयात
कोणत्या वाहनावर किती डिस्काउंट?
मारुतीच्या या अनेक कारवर डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंट ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, कॉर्पोरेट सूट आदींचा समावेश आहे. दरम्यान मारुती एसयूव्ही ब्रेझा, एर्टिगा आणि डिझायर सीएनजीवर कोणतीही सूट देत नाही. Maruti Celerio वर कंपनी जवळपास 70,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट येत आहे. सोबतच मारुती Eeco वर 35,000 रुपयांची सूट मिळत आहे. कंपनीची नवीन हॅचबॅक कार Fronx वर 40,000 रुपयांची सूट मिळत आहे.
Grand Vitara SUV तसेच Ciaz वर देखील डिस्काउंट ऑर सुरु आहे. Grand Vitara SUV वर व Ciaz वर 35000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. मारुतीची आणखी एक मोस्ट डिमाण्डेड कार आहे ती म्हणजे Baleno. बलेनो वर देखील कंपनी साधारण 65,000 रुपयांपर्यंत सूट आहे. या स्कीम, डिस्काउंट डिसेम्बर अखेर पर्यंत उपलब्ध आहेत. ज्यांना मारुती कार घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी असून खूप मोठी बचत होईल.
या कार वर देखील मिळतोय भरपूर डिस्काउंट
Alto K10 च्या विविध व्हेरिएंटवर देखील सध्या डिस्काउंट सुरु आहे. या मॉडेल्सवर साधारण 52000 ते 63000 रुपयांपर्यंत डिस्काउंट आहे. S-Presso वर Rs 56000 आणि Wagon R वर 63000 पर्यंत सूट मिळत आहे.
नवीन वर्षात महागाईचा फटका
मारुती सुझुकीने 1 जानेवारी 2024 पासून कारच्या किमती वाढवण्याची घोषणा यादीच केली असून लगेचच पुढील महिन्यात याची कार्यवाही होईल. वाढत्या खर्चाच्या हिशोबाने कंपनीने हे पाऊल उचललेलं आहे. सध्या कंपनी आपल्या कार वर विक्री वाढण्याच्या उद्देशाने डिस्काउंट देत आहे. डिसेंबर महिन्यात कंपनीला आपल्या कार विक्रीमध्ये तेजी आणायची आहे. त्यामुळे कंपनी सध्या विक्रीच्या हिशोबाने पॉलिसी राबवत आहे.