अहमदनगर बातम्या

मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 09 ऑक्टोबर 2021 :-   पारनेर तालुक्यातील निघोज, जवळे परिसरात गुरुवारी रात्री व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध पिकांचे मोठे नुकसान झाले.

निघोज, जवळा परिसरातील वडनेर बुद्रूक, देविभोयरे, वडझिरे, गुणोरे, राळेगण थेरपाळ, गाडीलगाव या गावांना दोन दिवस पावसाने झोडपून काढले.

तालुक्याच्या इतर भागातही शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले. पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत यासाठी संबंधितांना लोकप्रतिनिधींनी सूचना द्याव्यात.

तालुका कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीबाबत माहिती दिली. त्यांनी कृषी सहायकांमार्फत तातडीने पंचनामे करणे अपेक्षित आहे. पंचनाम्या संदर्भात अडचण आल्यास शेतकऱ्यांनी शिवबा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,

असे आवाहन शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी केले. निघोज, जवळे परिसरात पावसामुळे पिकांसाठी केलेला खर्च आणि हाताशी आलेली पिके वाया गेली आहेत.

Ahmednagarlive24 Office