अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- जितेंद्र अशोक कुंटे व त्यांच्या पत्नी यांची विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये कोविड 19 ची बनावट चाचणी अहवाल सादर करून त्यांची आर्थिक फसवणूक करीत त्यांच्या पत्नी ला बाळंतपणासाठी कोविड वार्डात दाखल करण्यात आल्याने त्यामुळे ते व त्यांचे पती हे कोरोना पॉझिटिव्ह झाले.
त्यामुळं पीडित कुंटे यांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी करून देखील त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत चौकशी अधिकारी डॉ.जयश्री रौराले वैद्यकीय अधिकारी हे वेळकाढूपणा करीत,वादग्रस्त आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांच्या सल्ल्याने हॉस्पिटल प्रशासन व अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्याशी आर्थिक हितसंबंध जपत पीडितांची दिशाभूल करून त्यांच्या कडून पैसे लुटण्याचा गैरव्यवहार झाला आहे
त्यामुळे पीडित कुंटे यांना या गोष्टी लक्षात आल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांची भेट घेवून न्याय मिळवून द्यावा अशी विनंती अर्ज केला असता वंचित चे पदाधिकारी यांनी पीडित कुंटे यांना सोबत घेऊन १३/०९/२०२१ रोजी संबंधित विभागाच्या आरोग्य अधिकारी यांना समक्ष भेटून देण्यात आला होता
परंतु त्यावर कुठल्याही प्रकारचे उत्तर न आल्याने स्मरण पत्र म्हणून मनपा अहमदनगर आयुक्त श्री.शंकर गोरे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले प्रमाणे जर २६/०९/२०२१ पर्यंत पीडित कुंटे यांना न्याय नाही मिळाल्यास वंचित बहुजन आघाडी अहमदनगर दक्षिण जिल्ह्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांच्या नेतृत्वाखाली विघ्नहर्ता हॉस्पिटल समोर हॉस्पिटल प्रशासन,
मनपा आयुक्त आणि मनपा आरोग्य अधिकारी यांच्या पुतळ्याचे दहन करून मोठ्याप्रमाणात जन आंदोलन करण्यात येणार आहे असे असताना मनपा आरोग्य अधिकारी तसेच तपासी वैद्यकीय अधिकारी यांनी अजून १५ दिवसाची मुदत मागणीच पत्र तूर्तास हे जन आंदोलन करू नये असे पत्र आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांना काढण्यात आले परंतु जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे यांनी हे आपल्या जिल्हा पदाधिकारी,
शहर पदाधिकारी,कार्यकर्तेसह हॉस्पिटल प्रशासन, मनपा आयुक्त,मनपा आरोग्य अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून मोठ्याप्रमाणात आंदोलन करण्यात येणार आहे व होणाऱ्या परिणामास हॉस्पिटल प्रशासन आणि अहमदनगर महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असे स्पष्ट केले आहे
त्याचा बरोबर शहरातील जनतेला आव्हान करण्यात आले की विघ्नहर्ता हॉस्पिटल व इतर कोणत्याही हॉस्पिटल मध्ये पीडित कुंटे सारखे आर्थिक लुटीचे प्रकार किंवा फसवणूक झाली असेल तर त्यांनी पण मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे.