जिल्हाधिकारी भोसले यांना मातृशोक

Ahmednagar News : जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मातोश्री सौभाग्यवती चतुराबाई बबनराव भोसले यांचे नुकतेच राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय ७७ होते. शनिवार रोजी किन्हई (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथे मातोश्री चतुराबाई यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.

त्यांचे पश्चात पती बबनराव आप्पासाहेब भोसले यांच्यासहित ज्येष्ठ चिरंजीव गजाननराव भोसले (सेवानिवृत्त गटविकास अधिकारी) डॉ.राजेंद्र भोसले (जिल्हाधिकारी,अहमदनगर) आणि विजयराव भोसले ही तीन मुले, तीन सुना आणि सहा नातवंडे असा मोठा परिवार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकरी कुटुंबाची कन्या असलेल्या चतुराबाई यांनी विवाहनंतर आपले पती बबनराव यांच्या जोडीने आपल्या मुलांवर कष्टाचे आणि शिक्षणाचे संस्कार केले. त्या संस्कारातूनच त्यांची मुले प्रशासनातील वरिष्ठ पदावर पोहोचली. किन्हई या मूळ गावी मातोश्री चतुराबाई यांच्या अंतिम क्रियाकर्माच्या वेळेस भोसले परिवाराचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.