अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- अलीकडच्या काळात जग वेगाने बदलत आहे असे म्हणतात त्याचे दृष्य परिणाम आता सर्वसामान्यांना देखील दिसत आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण आपल्या आजुबाजूला अनेक अनपेक्षीत घटना घडत आहेत.
अशीच घटना नगर तालुक्यात घडली आहे. येथील एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री शेडमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६५ कोंबड्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे.
न्या प्रकरणी आढाव या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आढाव या शेतकऱ्याचे नगर तालुक्यातील वाळकी शिवारात पोल्ट्री फार्मचे शेड असून, अज्ञात चोरट्याने या शेडची लोखंडी जाळू कापून आत प्रवेश करून
शेडमधील ६५ बॉयलर कोंबड्या चोरुन नेल्या. यात याशेतकऱ्याचे जवळपास १० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोना.कदम हे करत आहेत.