नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे म्हणाल्या कोरोना रोखण्यासाठी ‘हे’ करा …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-कोरोनाचे वाढते संकट पाहता संगमनेर नगरपालिकने सर्वतोपरी उपाययोजना केल्या आहेत. कम्युनिटी हॉस्पिटल सुरू करून,

सातत्याने हायपोक्लोराईडची फवारणी, जनजागृती, सर्वेक्षण व कर्मचार्‍यांनी अविरत सेवा देत कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या आहेत.

परंतु आता नागरिकांचेही सहकार्य गरजेचे असून नागरिकांनी विविध समारंभ टाळत शासनाच्या सर्व नियमांसह स्वयंशिस्त पाळावी असे आवाहन संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

पुढे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जगासह राज्यात आणि आपल्या तालुक्यात व शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिका सुरुवातीपासून काळजीपूर्वक काम करत आहेत.

कोरोना तपासणीसाठी राज्यात सर्वप्रथम आयएमए व निमा यांच्या सहकार्यातून कॉटेज हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम कोविड-19 तपासणी केंद्र सुरू केले व हाच पॅटर्न पुढे संपूर्ण राज्यात राबविला गेला.

आता हे मानवजातीवरील संकट असून त्याचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आता स्वयंशिस्त व शासनाचे सर्व नियम पाळावेत. मागील एक महिन्यापूर्वी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर अनेक नागरिक बिनधास्त वावरत आहेत.

यातूनच करोनाचा प्रादुर्भाव वाढू पाहतो आहे. म्हणून प्रत्येकाने विनाकारण घराबाहेर फिरणे टाळावे, गर्दी करणे टाळावे, मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हँड सॅनिटायझर वापरावे,

याचबरोबर घरगुती होत असलेले समारंभ, लग्न समारंभ, वाढदिवस, विविध जेवणावळी हे पूर्णपणे बंद करावेत जेणेकरून करोना पूर्णपणे रोखता येईल. असे आवाहनही नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24