रस्त्यावरील खड्डे पॅचिंग करण्याचे महापौरांचे आदेश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-बोल्हेगाव नागापूर येथील प्रभाग क्र.7 मधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डयांचे पॅचिंग करण्याच्या मागणीचे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते कुमार वाकळे यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना स्मरणपत्र दिले.

सदर रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा देताच महापौर वाकळे यांनी तातडीने ठेकेदारास रस्त्यावरील पॅचिंग करण्याचे आदेश दिले. यावेळी नगरसेवक राजेंद्र कातोरे, गणेश भोसले, नितीन बारस्कर, रमेश वाकळे, सचिन गांगर्डे, प्रशांत शिरसाठ, सनी वाकळे, दशरथ वाकळे, गौतम कापडे, नवनाथ कोलते, नामदेव कापडे, बिपिन काटे, सावळेराम कापडे, अरुण कातोरे, दीपक दौंड, निलेश ढगे आदी उपस्थित होते. बोल्हेगाव नागापूर येथील प्रभाग क्र. 7 परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याची पाऊसामुळे मोठी दुरावस्था झाली आहे.

रस्त्यावर लहान-मोठे खड्डे पडलेले आहे. यामध्ये मुख्यत: बोल्हेगाव गावठाण जिल्हा परिषद शाळा ते केशव कॉर्नर ते अर्जुन सोनवणे ते शंभूराजे चौक ते गणेश चौक पर्यंतचा रस्ता, हॉटेल चैतन्य क्लासिक ते आंबेडकर चौक ते राजमुद्रा चौक ते श्रीराम चौक ते विशाल हनुमान ते गांधीनगर निंबळक रस्त्यापर्यंतचा रोड, बालाजी नगर चौक ते भगवान बाबा चौक ते माहेश्‍वरी किराणा दुकान ते सचिन गांगर्डे यांच्या घरापर्यंतचा रोड,

धनंजय वाघ ते चंद्रशेखर वाघ घर ते एकनाथ वैराळ माहेश्‍वरी किराणा दुकाना पर्यंतचा रोड, गणेश चौक ते ज्ञानेश्‍वर मंदिर ते आंबेडकर चौक रोड, कोलते घर ते चंदूशेठ गवांदे घर ते डोळस घर ते भगवान बाबा चौक पर्यंतचा रोड, श्रीराम चौक ते खंडागळे मामा घर ते तिरंगा प्रिंटिंग प्रेस ते मोहारी मामा यांच्या घरापर्यंतच्या रोडवरील लहान-मोठे खड्डयांचे पॅचिंग करण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात 28 सप्टेंबरला निवेदन देण्यात आले होते.

तर सदर प्रश्‍नी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. 3 नोव्हेंबरला स्मरणपत्र पाठवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. 6 नोव्हेंबरला ई निविदा प्रक्रिया चालू असल्याचे व ठेकेदाराची नेमणुक झाल्यास काम त्वरीत सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु सद्य परिस्थितीमध्ये या रस्त्यावर लहान-मोठे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. नागरिकांना रस्त्यावरून रहदारी करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.

खड्ड्यांमुळे नागरिकांना मणक्याचे व रस्त्यावरील धुळीमुळे श्‍वसनाचे वेगवेगळ्या व्याधी निर्माण झाल्या असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. बोल्हेगाव नागापूर येथील प्रभाग क्र.7 मधील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डयांचे पॅचिंग करण्याचे ठेकेदार व संबंधीत अधिकार्‍यांना त्वरीत आदेश द्यावे. अन्यथा येत्या आठ दिवसात सदर रस्ता पॅचिंगचे काम सुरु न झाल्यास राष्ट्रवादीच्या वतीने

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्मरणपत्राद्वारे नगरसेवक तथा माजी सभागृह नेते कुमार वाकळे यांनी दिला आहे. चौकट- महापौर बाबासाहेब वाकळे यांनी प्रभाग 7 मधील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील खड्डयांचे पॅचिंगचे काम येत्या सात दिवसात पूर्ण होणार असल्याचे आश्‍वासन देऊन त्वरित कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले आहे. तर यासंबंधी ठेकेदारांना कामाचे आदेश त्यांनी दिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24