मयूर पाटोळे यांच्या पाठपुराव्याने दफनभूमीचा चेहरा मोहरा बदलला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- नागापूर , बोल्हेगाव फाटा येथील ख्रिस्ती दफनभूमी ची फारच दुर्दशा झाली होती, गवत इतके वाढले होते की जमीन व रस्ता देखील दिसत नव्हते ,त्यातच शेजारी सीना नदी,

व सर्व अस्वच्छ पणा मुळे जंगली प्राण्याचा धोका व आरोग्याचा धोगा हा अतिशय दुखत प्रसंग घडल्यावर निर्माण होत होता, ह्या अडचणीकडे कुठल्याही स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले

नाही त्यामुळे ख्रिस्ती धर्मगुरूंनी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे यांच्याकडे धाव घेतली. पाटोळे कडक लॉकडाऊन सुरू असताना त्वरित या ठिकाणी हजर झाले

दफनभूमीची पाहणी केली त्याच दिवशी आयुक्त माइकलवार यांच्याबरोबर बैठक घेऊन तातडीने काम मार्गी न लागल्यास आंदोलन करू अशी आक्रमक भूमिका घेतली,

व ह्या विषयाचा संपूर्ण पाठपुरावा केला, मनपा कर्मचारी कमी असताना केवळ पाटोळे यांच्या पाठपुराव्याने खाजगी कामगार लावून महानगरपालिकेने हे काम पूर्ण करून दिले आहे. पाटोळे यांच्या तातडीने काम हाती घेऊन मार्गी लावून दिल्याने त्यांच्या कामाच्या आक्रमक पद्धतीची चांगली चर्चा होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24