अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरदेवळे ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांच्या प्रेरणेने व श्री साईबाबा मंदिर (भिंगार), दिपकभाऊ राहिंज यांच्या वतीने भिंगार व नागरदेवळे येथील चारशे कुटुंबीयांना रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंदिराचे पुजारी शिरीष देशपांडे, खजिनदार दिलीपशेठ गुगळे, अशोक शेजवळ, निलेश बनकर, संतोष कुर्हाडे, उद्योजक श्रीराम दळवी आदि उपस्थित होते. महेश झोडगे म्हणाले की,
सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू माणून विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टीकोनाने कामे चालू आहेत. कोरोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी पुरेपुर उपाययोजना करुन व नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक गोळ्या उपयुक्त ठरत असल्याचे दिपकभाऊ राहिंज यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved