अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : अल्पवयीन मुलाचा छळ केल्याप्रकरणी महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे व अग्निशमनचे अधिकारी मिसाळ यांच्याविरुद्ध हहा दाखल करण्यात आला होता.
या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हे दोघेही यांनतर पसार झाले होते. आता जिल्हा न्यायालयाने महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
डॉ. बोरगे यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर जिल्हा न्यायाधीश पी. व्ही. चतुर यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली.
कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोना काळात महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. बोरगे यांच्यावर जबाबदारी आहे. ते शहर सोडून जाणार नाहीत.
तपास कामात पोलिसांना सहकार्य करतील, असा युक्तिवाद डॉ. बोरगे यांचे वकील अॅड. शिवाजी सांगळे यांनी केला. त्यांनतर न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews