मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात सभा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांची गुरुवार, ता. २३ रोजी साई लॉन्स, पाथर्डी रोड, शेवगाव येथे दुपारी जाहीर सभा होणार आहे. या सभेची तयारी सुरू असून, हजारो मराठा बांधव उपस्थित राहतील, अशी माहिती सकल मराठा नियोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यभर तिसऱ्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. राज्यात त्यांच्या विविध ठिकाणी सभा सुरू आहेत.

शेवगाव शहरात जरांगे पाटील प्रथमच येत असून, ही सभा नियोजनबध्द व्हावी, यासाठी मराठा समाज समितीचे पदाधिकारी सरसावले आहेत. नेवासा येथे गुरुवार, ता. २३ रोजी सकाळी जरांगे यांची सभा होणार आहे.

ती सभा संपल्यानंतर नेवासा शेवगाव राज्यमार्गावर ठिकठिकाणी जरांगे यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शेवगाव येथे दुपारी सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.

महिला व वृध्दांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी तालुक्यासह जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नियोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.