यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुलेंना स्मृती दिनी अभिवादन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

तर शहरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली. यावेळी यशस्विनीच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील, महिला बालविकास अधिकारी विजयामाला माने, समन्वयक रोहिणी पवार, आरती बडेकर, वैशाली नराल, रोहिणी वाघिरे आदी उपस्थित होत्या.

रेखा जरे पाटील म्हणाल्या की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. शिक्षणाची दारे उघडी करुन, आजच्या युगात महिलांना सन्मान फुले दांम्पत्यांनी मिळवून दिला आहे. स्त्री शिक्षणाच्या चळवळीत कार्य करताना सावित्राबाईंच्या अनेक आठवणी नगरशी जोडल्या गेल्या आहेत.

शहरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी संघटनेने सातत्याने महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा केला असून, या स्मारकाचा प्रश्‍न तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24