अहमदनगर बातम्या

पुढच्या दोन महिन्यात लवकरच कर्जतला एमआयडीसी आणणार – आमदार रोहित पवार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : घुमरी सबस्टेशनच्या कामाकरीता पाठपुरावा आम्ही केला, मंजुरीही आणली. मात्र, विरोधकांनी माझ्या आणलेल्या कामाला स्थगिती देण्याचे काम केल्याचा आरोप करत राज्य सरकारला एमआयडीसी करण्यासाठी भाग पाडून पुढच्या दोन महिन्यात लवकरच कर्जतला एमआयडीसी आणणार असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.

तर मांदळी – निमगाव गांगर्डा रस्त्याच्या कामाचे श्रेय विद्यमान खासदार आणि लोकांतून निवडून आलेल्या आमदाराचे असल्याचे सांगत त्यांनी आ. शिंदे यांचे नाव न घेता टोला लगावला.’

कर्जत तालुक्यातील घुमरी येथे नवीन ३३/११ केव्ही क्षमतेच्या वीज उपकेंद्राचे (सबस्टेशन) कामाचे लोकार्पण आ. रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमात ते बोलत होते.

आ. पवार म्हणाले, सिना नदीवरील सर्व बंधाऱ्यांवर लातूर पद्धतीने गेट लवकरच बसविण्यात येणार असून, मतदारसंघात रस्त्याची कामे तसेच शैक्षणिक क्षेत्रात मुलांना चांगले शिक्षण घेता यावे म्हणून प्रत्येक शाळा डिजिटल बनविण्यासाठी प्रयत्न करू.

कुकडीचे पाणी सिना धरणात आणण्याकरिता आपण प्रयत्नशील आहोत. पुढील काळातदेखील मतदारसंघात भरीव निधी आणू. विकासाची कामे करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office