अहमदनगर बातम्या

भरधाव कारने मायलेकींना उडवले ! मुलीचा मृत्यू , आरोपीला अटक करेपर्यंत अंत्यसंस्कार करण्यास नातेवाईकांचा नकार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : मोटारसायकलवर चाललेल्या मायलेकींना धडक दिल्याने यातील मुलगी प्रतीक्षा सोनवणे हिचा जागीच मृत्यू झाला तर तिची आई जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारनेर-बेल्हे रोडवर देवीभोयरे फाट्यानेजीक डेअरीजवळ झाला.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसारः मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पारनेर – बेल्हे रोडवर देवीभोयरे फाट्यानजीक डेअरीजवळ एका पांढऱ्या रंगाच्या कारने मयत प्रतीक्षा सोनवणे हिच्या बजाज कंपनीच्या बॉक्सर मोटारसायकल क. (एम एच 16 पी. ३३९८), हिला समोरून जोरात धडक दिली.

ह्यात प्रतीक्षा गोरख सोनवणे (वय २३), रा. पुणेवाडी, ता. पारनेर ही गंभीर जखमी झाली, तिला उपचाराकरता पारनेर येथे ग्रामीण रुग्णालयात आणले असता, तिला मयत घोषित करण्यात आले तर प्रतीक्षा हिची आई (नाव समजले नाही) गंभीर जखमी झाली.

दरम्यान, धडक देणारा कारचालक मदत न करता पळून गेल्याने मयत प्रतीक्षा सोनवणे यांच्या नातेवाईकांसह पुणेवाडी गावातील कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला. मयत प्रतीक्षा सोनवणे हिची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला, नातेवाईकांनी पारनेर पोलीस स्टेशन येथे आधी आरोपींना अटक करा, मगच आम्ही अंत्यसंस्कार करू असा पवित्रा घेतला.

या वेळी पुणेवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब रेपाळे, अमोल साळवे, राजेंद्र करंदीकर, सचिन नगरे आदींसह पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्याशी चर्चा केली. या वेळी पोलीस निरीक्षक बारावकर यांनी आरोपीला पकडण्यासाठी पथके पाठवली असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल,

आपण मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करावा, अशी विनंती केली. त्यानंतर मयत प्रतीक्षा सोनवणे हिच्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, या बाबत मयत प्रतिक्षा सोनवने हिचे वडील गोरख यादव सोनवने यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office