दुधवाहक टेम्पोची दुचाकीस्वारास धडक; दुचाकीचालक ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली असल्याने आता सर्वत्र वाहतूक सेवा पूर्वरत झाली आहे. या दरम्यान जिल्ह्यात अपघातांचे सत्र देखील वाढू लागले आहे. दरदिवशी होणारी अपघातांची आकडेवारी चिंताजनक आहे.

यातच आजच्या दिवसाची सुरुवात देखील अपघाताने झालीच आहे. आश्वीकडून संगमनेरच्या दिशेने येणार्‍या दुधवाहक टेम्पोने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रहिमपूर शिवारातील डोंगरेवस्ती येथे आज (सोमवार ता.9) सकाळी घडली आहे.

याबाबत आश्वी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील दुधाचा टेम्पो (क्र.एमएच.17, टी.5283) हा आश्वीकडून संगमनेरच्या दिशेने येत होता. त्याचवेळी संगमनेरकडून आश्वीच्या दिशेने अक्षय सोमनाथ गोसावी (वय 23) हा तरुण दुचाकीवरुन जात होता.

यावेळी समोरुन येणार्‍या टेम्पोने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार अक्षय गोसावी याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24