अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-शहरात वाहतूक कोंडीबरोबरच अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहन चालकांना शिस्त नसल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होते.
तसेच वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी व बेशिस्त वाहन चालकांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांकडून धडक कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.. वाहतूक नियमांचा भंग करणार्या वाहन चालकांविरूद्ध शहर पोलिसांनी कारवाईची विशेष मोहीम सुरू केली आहे.
चारचाकी वाहनांबरोबर दुचाकी वाहन चालकाविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. नियमांचा भंग करत विरूद्ध दिशेने वाहन चालविल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, अपघात होत आहे. यामुळे विरूद्ध दिशेने (नो एंट्री) वाहन चालविणार्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे.
ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, दुचाकीला फॅन्सी नंबरप्लेटचा वापर करणे, भरधाव वेगाने दुचाकी चालविणे, मोबाईलवर बोलणे अशा दुचाकीस्वारावर कारवाई केली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये 7 हजार 247 वाहन चालकाविरूद्ध कारवाई करून 20 लाख 12 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी अविनाश शिळीमकर यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी हा कारवाईचा धडाका लावला. चारचाकी वाहन चालविताना सिटीबेल्ट नसलेल्या 1 हजार 977 जणांकडून 3 लाख 95 हजार 400 रुपये वसूल केले. नो एंट्रीत वाहन चालविणार्या 1 हजार 303 वाहन चालकांविरूद्ध कारवाई करून 2 लाख 60 हजार 600 रुपये वसूल केले.
फॅन्सी नंबर प्लेट वापरणे, प्लेट नसणे अशा 163 चालकांकडून 44 हजार 600 रुपये दंड वसूल केला. तर भरधाव वेगाने वाहन चालविणार्या 199 लोकांकडून 11 लाख 9 हजार रुपये वसूल केले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved