बनावट धनादेशाद्वारे खात्यातून लाखो रुपये काढले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :- बिहार राज्यातील छपरा येथील बँक ऑफ बडोदा शाखेतील डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग ऑफिस अर्ज बचत खाते द्वारे दोन बनावट धनादेश द्वारे नगर मधील सावेडी शाखेतून तब्बल 89 लाख रुपये काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी खातेदार संदीप बाबा मंगीलाल कोठारी राहणार पोतदार वाडा हिरवे गल्ली म्हसोबा मंदिर जवळ नालेगाव नगर यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी याप्रकरणी संदीप कोठारी व गणेश विठ्ठल गावडे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना न्यायालयात हजार केले अस्ताला या दोघांनाही न्यायालयाने तीन डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत बँक ऑफ बडोदा वरिष्ठ अधिकारी संजय डोंगरे राहणार पाईपलाईन रोड सावेडी यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी कोठारी यांनी २० नोव्हेंबरपर्यंत विविध एटीएम मधून पैसे काढले आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24