नोकरीचे आमिष दाखवत लाखोंना गंडवले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- आरोग्य खात्यात नोकरी लावून देतो म्हणून नोकरीचे अमिष दाखवून चार लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात योगेश भाऊसाहेब गुडघे,

वय 36 रा. बोल्हेगाव फाटा यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, भाचा सागर आण्णासाहेब घाडगे यास आरोपी सोमनाथ सहादू पातकळ, माहेश्‍वरी उर्फ राणी सोमनाथ पातकळ,

शरद एकनाथ ढिसले यांनी आरोग्य खात्यात नोकरी लावून देतो असे म्हणून विश्‍वास संपादन करुन त्यास नोकरीचे अमिष दाखविले.

तसेच चेकद्वारे व रोख असे मिळून चार लाख रुपये घेवूनही भाचा यास नोकरीला न लावता, पैसे परत न देता फसवणूक केली.

यानुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.पवार करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24