मंत्री गडाखांचे नेवाशाला ‘दसरा गिफ्ट’ ; तीन कोटी मंजूर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नेवासा नगरपंचायतीसाठी 7 कोटी 89 लाख 42 हजार रुपयांची मागणी आपण या योजने अंर्तगत निधी मिळावा अशी मागणी नगरविकास विभागा कडे केली होती. त्यापैकी 3 कोटी रुपये मंजूर झाले असून उर्वरित निधी देखील लवकरच मंजूर होणार आहे.

नेवासा शहरातील नागरिकांना या निधीतून पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. येणाऱ्या काळातही विविध योजने अंतर्गत नेवासा शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यात येणार असून त्यासाठी शासन दरबारी शहरविकासाचे अनेक प्रस्ताव देखील सादर करण्यात आलेले असल्याची माहिती राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.

ऐन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तालुक्याचे लोकप्रतिनिधी व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासे शहराच्या विकासासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करत नेवासेकारांना शहर विकासाचे ‘दसरा गिफ्ट’ दिले आहे. नेवासे शहरवशीयांनी हा भरीव निधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत मंत्री गडाखांचे आभार मानले आहे.

पालखी मार्ग,काशी विश्वेश्वर मंदिर येथे सुशोभिकरण ,गणपती घाट सुशोभिकरण मारुती मंदिर ते डॉक्टर कानडे ते डॉक्टर शिंदे घर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करणे. मिटकरे घर ते पिंटू परदेशी घर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे. काटे महाराज आश्रम ते सेंट मेरी वस्तीगृह पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे.

गाणे घर ते ओम शांती केंद्र रस्ता कॉंक्रिटीकरण करणेज्ञानेश्वर मंदिर ते आप्पा इरले घर रस्ता कॉंक्रिटीकरण ,लक्ष्मी आई मंदिर सुशोभिकरण,ज्ञानोदय शाळा ते बीएसएनएल ऑफिस ते खंडागळे हॉस्पिटल रस्ता डांबरीकरण अशी विविध कामे यात आहे .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24