मंत्री गडाखांचा साधेपणा…ग्रामस्थांसोबत बैठक घेत समस्या सोडविण्याचे दिले आश्वासन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- आपली साधारण राहणीमान व उच्च विचारसरणी साठी प्रसिद्ध असलेले राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांचे साधेपण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

गडाख यांनी नुकतेच नेवासा तालुक्यातील गळनिंबसह खेडले काजळी , मंगळापूर येथे जाऊन ग्रामस्थांसोबत बैठका घेत काही महत्वाच्या समस्येंवर चर्चा केली.

यावेळी गडाख यांनी पीक, पाणी, वीज विविध प्रश्नांवर चर्चा करत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. गडाख यांनी जायकवाडी धरणाची पाणी पातळी,

गोदावरी नदीपात्रातील पाणी विसर्गाची माहिती, पिकांची सद्य स्थिती मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी पिकांसाठी वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने व्हावा यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

तसेच शेतकरी बांधवानी सुयोग्य व्यवस्थापन करून पिकांचे नियोजन करावे तसेच नागरिकांनी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे असे आवाहन ना गडाख यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले.