अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- माझे स्नेही असलेले स्व.दिलीप गांधी यांनी मोठी विकासकामे केली आहेत. विशेषतः नगरच्या उड्डाणपुलासाठी व रस्त्यांच्या कामासाठी त्यांचा वारंवार पाठपुरावा माझ्याकडे होता.
त्यांनी सुचवलेले सर्व कामे मी पूर्ण करून त्यांचे विकासकामांचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. मात्र झालेला हा विकास पाहण्यास ते आपल्यात नाहीत. गांधी परिवाराच्या व सुवेंद्रच्या मी कायम पाठीशी असणार आहे, असे आश्वासन केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
केंद्रीय मंत्री गडकरी शनिवारी नगरला आले असता त्यांनी स्व. गांधी यांच्या निवासस्थानी जावून गांधी परिवाराची भेट घेतली. स्व.गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. सरोज गांधी, देवेंद्र गांधी, सुवेन्द्र गांधी व स्वानंद नवसारीकार यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
माजी मंत्री राम शिंदे, ज्येष्ठ नेते सुनील रामदासी आदी उपस्थित होते. अमर रहे, अमर रहे दिलीप गांधी अमर रहे.., अशा घोषण यावेळी उपस्थितांनी दिल्या. सरोज गांधी म्हणाल्या, दिलीप गांधी यांना नितीन गडकरी यांनी आयुष्यभर साथ दिली. त्यांच्या प्रत्येक कामात सहकार्य केले.
याबद्दल आभार मानते. स्वर्गीय माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.