अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी तालुक्यातील वांबोरी गावात असलेल्या प्रसाद साखर कारखान्यानं शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. 2018 साली साखर कारखान्याने 2321 रूपये प्रतीटन भाव जाहीर केला व राहुरी तालुक्यातील ऊस उत्पादकांना त्यानुसार पैसेही अदा केले.
मात्र नेवासा आणी श्रीरामपूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना केवळ 2100 रूपयांप्रमाणे पैसे दिले गेले. आज देऊ उद्या देऊ.. अशी केवळ आश्वासने दिली गेली. 221 रूपयांप्रमाणे हजारो शेतकऱ्यांचे जवळपास सव्वा दोन कोटी रूपये शेतकऱ्यांना घेणं आहे. मात्र, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत.
यामुळे महाराष्ट्र सरकारमधील राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान ऐन दिवाळीत उपाशीपोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपूरे प्रसाद साखर कारखान्याच्या गेटसमोर ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
आता तर प्राजक्त तनपूरे सत्तेत असल्याने कोणासही दाद देत नसल्याचं चित्र आहे. दरम्यान आमचे पैसे दिले जात नाही तोवर आम्ही उठणार नाही, असा पवित्रा ऊस उत्पादक शेतकरी आंदोलकांनी घेतला आहे.
यामुळे ऐन दिवाळीला कारखानदार तुपाशी आणी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असल्याचं शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved