पाथर्डीमधील बिबट्याच्या हल्ल्यात मृत चिमुरड्याच्या कुटुंबीयांस राज्यमंत्री तनपुरे यांची ‘ही’ मदत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील विविध तालुक्यात बिबट्या मानवी वस्तीत घुसल्याने अनेक ठिकाणी हौदोस घालताना दिसत आहे. परंतु पाथर्डी तालुक्यात नरभक्षक बिबट्याने 15 दिवसांत तीन बालकांना बिबट्यानेे पालकांसमक्ष उचलून नेत ठार मारले.

यातील पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील सार्थक बुधवंत या चार वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सोमवारी बुधवंत कुटुंबियांची भेट घेऊन मयत मुलाचे वडील संजय बुधवंत यांच्याकडे पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.

तसेच पाच वर्षांच्या मुदत ठेवीवर पाच लाख तर दहा वर्षांच्या मुदत ठेवीवर आणखी पाच लाख अशी एकूण पंधरा लाख रुपयांची आर्थिक मदत बुधवंत कुटुंबियांना करण्यात येणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी यावेळी सांगत उर्वरित 10 लाख रुपये दोन-चार दिवसांत त्यांच्या खात्यावर वर्ग होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, वन विभागाचे तब्बल 80 अधिकारी-कर्मचार्‍यांसह बिबट्याला शोधण्यासाठी दोन ड्रोनसह पंचवीस ट्रॅक कॅमेरे लावण्यात आले आहेत. सिन्नर, जुन्नर, संगमनेर, धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद आणि बीड येथील पथके दाखल झाले असून त्यांनी त्या नरभक्षक बिबट्याची शोध मोहिम हाती घेतली आहे.

सर्च लाईट, नाईट मोड कॅमेरे, खोल दरीत उतरण्यासाठी अत्याधुनिक ट्युब संच, बेशुद्ध करण्यासाठीच्या बंदुका व औषधे रेस्क्यु व्हॅन्स, अंगावर फेकण्यासाठीचे जाळे, लाठया काठ्या, मानेभोवतीचे सेफ्टी बेल्टी, वॉकी टॉकी सेट अशा सर्व प्रकारच्या अत्याधुनिक साधन सामुग्रीसह शहरातील हंडाळवाडीपासून वृद्धेश्वर

घाट परिसर व गर्भगिरी डोंगर रांगाचा निर्जन प्रदेश या भागामध्ये सर्व कर्मचारी व अधिकारी विखुरले गेले आहेत. तालुक्यात ठिकठिकाणी 18 पिंजरे लावण्यात आले असून आवश्यकतेनुसार पिंजर्‍याची संख्या वाढविण्यासाठी इतर जिल्ह्यातून पिंजरे मागविण्यात आले आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24