सत्तेवर टिप्पणी करणाऱ्या भाजपाला मंत्री पाटलांचा सणसणीत टोला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- नगर दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीला चांगलाच सणसणीत टोला लगावला आहे. राज्यातील सत्तेवरून विरोधी पक्ष भाजप हा नेहमीच टीका करत असतात. मात्र आज पाटलांनी आपल्या शैलीमध्ये विरोधकांना उत्तर दिले आहे.

‘राज्यातील सरकारला बघता बघता एक वर्ष पूर्ण झाले आहे. हे वर्ष कसे गेले, हे भाजपला सुद्धा कळले नाही. आता सरकारची पुढची चार वर्ष कशी जातील, हे सुद्धा भाजपला कळणार नाही, असा टोला मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. मंत्री पाटील हे आज नगरला आले होते.

यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. ‘सरकार या एक वर्षात अनेक संकटांना सामोरे गेले. करोनाचे संकट सर्वात मोठे होते. राज्य सरकारने सर्व पद्धतीचा वापर करून करोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न केला. लॉकडाऊनमुळे सर्व बंद असल्यामुळे त्याचा महसुलावर परिणाम झाला.

आता सगळे पुन्हा उभा करण्याचे काम हळूहळू गेल्या महिन्या-दोन महिन्यात सुरू झाले आहे. जनजीवन पूर्वपदावर आले असल्यामुळे मला खात्री आहे, राज्य सरकारचे पुढच्या महिन्या-दोन महिन्यात उत्पन्न वाढेल.

त्यानंतर राज्य सरकार अधिक गतीने काम करेल. शपथ घेतल्यानंतर करोना येईपर्यंत राज्य सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले. हा धाडसी निर्णयांचा सपाटा आगामी काळातही सुरू राहील,’ असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24