मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणतात ‘ आहे तरी कोण ही कंगना?’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :-  सध्या सुशांत आत्महत्या प्रकरणामुळे अनेक विषय गाजत आहेत. त्यामुळे राजकारणही खूप तापले आहे. आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यात अभिनेत्री कंगना रानौत बिनधास्त बोलताना दिसत आहे.

नुकतच तिने एक मुंबई पोलिसांबाबत वक्तव्य केले होते. यावरून ती टीकेची धनी ठरली आहे. यावर भाष्य करताना महाविकास आघाडीचे राज्यमंत्री आ. प्राजक्त तनपुरे म्हणाले की, ‘मुंबई पोलिसांवर मला अभिमान आहे.

मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या विश्वासार्हतेवर देखील कोणी काही बोलण्याची गरज नाही. तसेच कंगना कोण आहे मी तिला ओळखत नाही त्यामुळे तिने काही ट्वीट केलं तर तिला गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

‘ मंत्री तनपुरे अहमदनगरमध्ये आले असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी त्यांनी म्हटलं, कंगना कोण आहे मी तिला ओळखत नाही तिने काही ट्वीट केलं त्याबाबत मी पाहीले नाही मला माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात अधिक रस आहे.

तसेच मुंबई पोलिसांवर मला अभिमान आहे कोणीही मुंबई पोलिसांच्या विश्वासार्हतेवर देखील बोलण्याची गरज नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

काय म्हणाली होती कंगना, क्काय आहे हे प्रकरण ? -: ‘मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते’ असे कंगना म्हणाली होती. यावर भाजप आमदार राम कदम यांनी तिला मुंबई पोलीस चांगले असल्याचे सांगत आश्वस्त केले होते.

परंतु, पोलीस महाविकासआघाडी सरकारच्या दबावाखाली असल्याचे राम कदम यांचे म्हणणे होते. यानंतर कंगना राणौतने तात्काळ राम कदम यांच्या ट्विटला रिप्लाय देत माझा मुंबई पोलिसांवर विश्वास नसून मला थेट केंद्र सरकार किंवा हिमाचल प्रदेश पोलिसांकडून सुरक्षा मिळाली तर बरे होईल, असे कंगनाने म्हटले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24