जनता दरबारात मंत्री तनपुरेंनी सोडविल्या नागरिकांच्या समस्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- नागरिकांच्या समस्यां सोडविण्यासाठी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यात त्यांनी जनता दरबार मध्ये पाथर्डी तालुक्यातील नागरिकांच्या समस्यां जाणून घेतल्या तसेच या समस्या सोडविण्याबाबत त्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या आहेत.

मंत्री प्राजक्त तनपुरेंच्या उपस्थितीत पाथर्डी तालुक्यातील मिरी व शिंगवे येथे जनता दरबारामध्ये ग्रामस्थांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात या जनता दरबारात प्रतिसाद मिळाला रस्ते वीज व पाणी या प्रमुख विषयासह इतरही ग्रामस्थांनी अनेक समस्या निवारण मांडल्या यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना समक्ष ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली त्यामुळे हा दरबार यशस्वी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी वीजप्रश्नी बोलताना तनपुरे म्हणाले कि, ट्रान्सफार्मर बदलण्याची जबाबदारी ही महावितरणची आहे. त्याची वाहतुक शेतकऱ्यांनी करायची नाही तसे स्पष्ट आदेश उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. शेतकरी बांधवांनी बिनधास्त रहावे तसेच महावितरण तातडीने ट्रान्सफार्मर बदलावा.

अन्यथा शेतकऱ्यांनी माझ्याकडे तक्रार करावी असे आवाहन यावेळी तनपुरे यांनी केले मिरी ता. पाथर्डी येथे जनता दरबारात ग्रामस्थांच्या शेकडो समस्या जागेवरच सोडवण्यात आल्या त्यावेळी तनपुरे यांनी हे आदेश दिले.

पाणी प्रश्नावर बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले…. :- वांबोरी चारीचे पाणी या भागाला कमी पडू देणार नाही अशी ग्वाही यावेळी तनपुरे यांनी दिली. तनपुरे म्हणाले की सध्या मुळा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यापूर्वीच संबंधित विभागांशी संपर्क करून धरण ओव्हरफ्लो झाले बरोबर वांबोरी ला पाणी सोडणे सुरू केले, त्यामुळे या भागातील अनेक गावांमधील शंभर तलावांमध्ये वांबोरी तलावाचे पाणी सोडले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24