मंत्री तनपुरे संतापले…तहसीलदारांना वेळेच भान आहे कि नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर गावोगावी मंत्री, राजकीय नेतेमंडळी भेटी देत परिस्थितीचा आढावा घेत आहे.

यातच हलगर्जीपणा करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना मंत्र्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात निर्माण झाले आहे. नुकतेच मंत्री प्राजक्त तनपुरे हे वांबोरी गावाकडे गेली असता गावात सुरु असलेला वैद्यकीय विभागाचा गलथान कारभार मंत्र्यांसमोर उघड झाला.

त्यामुळे यासाठी सर्वस्वी वैदकीय अधिकारी जबाबदार असतील असे म्हणत वैदकीय अधिकारी यांना मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खडेबोल सुनावले. एकीकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांना झापल्यानंतर मंत्री महोदयांचा रंगाच्या कचाट्यात तहसीलदार सापडले.

या वेळी घेण्यात आलेल्या बैठकीला हजर राहण्यास उशीर करणारे तहसीलदार फयसोद्दीन शेख यांचीही ना.तनपुरे यांनी चांगलीच कानउघडणी केली. सकाळी दहाच्या सुमारास मंत्री तनपुरे यांचा ताफा ग्रामपंचायतीत पोहचला बैठक सुरु होऊन अर्धा तास झाला तरी बैठकीसाठी तहसीलदार पोहचले नव्हते.

त्यावर मंत्री तनपुरे म्हणाले की, तहसीलदारांना वेळेच भान आहे कि नाही?लोकप्रतिनिधींनी वाट पहात बसायचे का? असा संताप व्यक्त केला. त्यांनतर पावणे अकराच्या सुमारास तहसीलदार बैठकीला पोहचले त्यावेळी मंत्र्यांनी त्यांना चांगलेच खडसावले.

अहमदनगर लाईव्ह 24