अल्पवयीन मुलीस भरदुपारी पळविले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- संगमनेर शहरातील मोमीनपुरा परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील १७ वर्षं १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला काल भरदुपारी १ च्या सुमारास अज्ञात आरोपीने अज्ञात कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले.

या घटनेने संगमनेर शहर परिसरात पालक वर्गात खळबळ उडाली असून मुलीच्या नातेवाईकांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोनि परमार यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनि साबळे हे अल्पवयीन मुलगी व तिला पळवून नेणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत. संगमनेर परिसरात मागेही अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच प्रकार घडले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24