ग्रामस्थांचे बीडीओंच्या दालनासमोर आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील शॉपिंग सेंटरचे बांधकाम अतिक्रमणावरील जागेत झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पंचायत समितीकडून कसलीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.

अतिक्रमणावर कारवाई होत नसल्यामुळे संताप झालेल्या ग्रामस्थांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र सोलाट,

वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रा. किसन चव्हाण, पंचायत समिती सभापती गोकूळ दौंड, रासपचे भाऊसाहेब उघडे, अरविंद सोनटक्के, भोरू म्हस्के, गोविंद दातीर, जगदीश सोलाट, अंकुश बोके,

पोपट क्षीरसागर आदी उपस्थित होते. दरम्यान आंदोलकांनी गट विकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे यांच्याशी चर्चा करून येत्या १८ तारखेला अतिक्रमण हटवण्याबाबतचे पत्र घेतले आहे.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. दरम्यान येत्या काळात या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाते का? हे लवकरच स्पष्ट होईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24