नागोरी मुस्लिम जमातच्या स्वयंघोषित ट्रस्ट्रींचा गैरकारभार निसार बाटलीवाला यांचा पत्रकार परिषदेत आरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- नागोरी मुस्लिम जमातच्या स्वयंघोषित ट्रस्ट्रींनी गैरकारभार केला असून, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निसार पवार (बाटलीवाला) यांनी केली.

सदर स्वयंघोषित ट्रस्टी गुन्हेगार प्रवृत्तीचे असून, त्यांच्या आशिर्वादाने लालटाकी येथील ट्रस्टच्या जागेवर अनाधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे.

तसेच पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आल्याचा आरोप निसार बाटलीवाला यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. शहरात लालटाकी अप्पू हत्ती चौकात पंडित नेहरू यांचे स्मारक आहे. नागोरी मुस्लिम जमातच्या स्वयंघोषित तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या ट्रस्टींनी सदर जागेवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करून त्याचे भाडे वसुली केली आहे.

महापालिकेला पंडित नेहरू पुतळ्याच्या परिसरातील अनाधिकृत अतिक्रमण काढण्यात वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. स्मारकाच्या जागेवर दारुड्यांचा उपद्रव वाढला आहे. नागोरी मुस्लिम जमातच्या कब्रस्तानमध्येही चोरटे दिवसभरात चोरी करून आणलेला माल रात्री जमा करतात. नंतर गुन्हेगार प्रवृत्तीचे स्वयंघोषित ट्रस्टी हे सदरचा माल विकत घेतात.

प्रशासनाने या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर योग्य ती कारवाई करण्याचा मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. अहमदनगर उर्दू हायस्कूलमध्ये व मिजगर कॉलेजमध्ये शिक्षक भरतीमध्ये स्वयंघोषित ट्रस्टी व चेअरमन तनवीर खान, मुनीर खान काटेवाले या लोकांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने भरती करुन घेतली. जुना सर्व्हे नं. 119 व 118 ही जागा चुन्नू बेग यांना इनामी मिळाली आहे.

या जागेची किंमत कोटी रुपये असल्यामुळे स्वयंघोषित ट्रस्टी इमरान शफी अहमद, इमरान जमीर खान, माजिद खान, खलील खान, मुनीर खान, तन्वीर खान काटेवाले, फरहान खान या सर्व लोकांनी जागेची लेन-देन करण्याचा प्रयत्न केला. इम्रान खान यांच्या विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. तसेच माजीद खान यांच्यावर नगर व शिरुर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहे.

नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहे. लालटाकी येथील कब्रस्तानमध्ये अनाधिकृतपणे वाहनांमध्ये घरगुती गॅसची रिफिलिंग केली जाते. या जागेत गुंड व आरोपी प्रवृत्तीच्या स्वयंघोषित ट्रस्टींच्या अनाधिकृत व्यवसाय चालत असल्याचा आरोप बाटलीवाला यांनी केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24