अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- समशेरपूर गटातील माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर राजकीय सुडापोटी अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल झाला. बोलवता धनी कोण आहे, हे लोकांना माहीत आहे.
फिर्यादी नामदेव डामसे याला शेणीत गावातील विकासकामांबाबत दराडेंना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. तो गावचा पाटील, सरपंच व सदस्यही नाही. दराडे यांच्या घरात अनाधिकाराने घुसून महिलांना नको ते प्रश्न विचारण्याचे काहीच कारण नव्हते.
तोच खरा आरोपी असताना त्याला पाठीशी घालत दराडेंवर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार म्हणजे कायद्याचा गैरवापर आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मीनानाथ पांडे यांनी सांगितले. निष्पक्ष चौकशी करून दराडे यांच्यांवरील गुन्हा काढण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी अकोल्यात सर्वपक्षीय व सर्व जातीधर्मातील लोकांचा मोर्चा काढण्यात आला.
आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चाचे सूत्रसंचालन मराठा महासंघाचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. कैलास जाधव, नितीन बेनके, सुरेश गभाले, नामदेव गोर्डवि, शिवाजी पाटोळे, भाऊसाहेब सहाणे, बाळासाहेब मालुंजकर, दीपक वैद्य, किसन धोंगडे, बाळासाहेब उगले, भाऊसाहेब धोंगडे यांनी भाषणात निषेध केला.
जनतेने आमदार डॉ. लहामटे यांना यासाठीच प्रचंड मताधिक्य देऊन निवडून आणले काय? असा प्रश्न उपस्थित केला. त करून निषेध नोंदवला. अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध नाही, पण त्याचा राजकारणासाठी गैरवापर करणाऱ्यांना आमचा विरोध आहे.
दराडे यांच्यावर दाखल गुन्ह्याचा तपास निष्पक्षपणे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आरोपी म्हणून त्यांना अटक करण्यात येऊ नये व तपासात गुन्हा खोटा दाखल असल्याचे दिसून आल्यास तो तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी आंंदोलकांनी यावेळी केली. पोलिस उपनिरीक्षक दीपक ढोमणे व नायब तहसीलदारांना आंंदोलकांनी निवेेदन दिले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved