२ जानेवारी २०२५ संगमनेर : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर, या तीन महिन्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत १८ हजार २७४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ५ कोटी ९६ लाख ६५ हजार ९०० रुपये काल बुधवारी (दि. १) वर्ग करण्यात आले असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या आचार संहितेमुळे सर्व योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग होण्यास वेळ लागला होता.मागील महिन्यात दोन कोटी रुपये वर्ग झाले होते.परंतु आता उरलेले सर्वच अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ६२८० लाभार्थ्यांना २ कोटी ६१ लाख ७४ हजार ४०० रुपये, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती ६१७ लाभार्थ्यांना १८ लाख ३३ हजार ९०० रुपये व संजय गांधी निराधार अनुदान योजना
अनुसूचित जमाती २५९ लाभार्थ्यांना ७ लाख ७१ हजार रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्व साधारण ५६७६ लाभार्थ्यांना १ कोटी ६५ लाख ७२ हजार रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच अनुसूचित जाती ६८१ लाभार्थ्यांना २० लाख ४३ हजार रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२२ लाभार्थ्यांना ९ लाख ६६ हजार रुपये.
श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४४३९ लाभार्थ्यांना १ कोटी १३ लाख ५ हजार ६०० रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्या वर वर्ग केले आहे.दरम्यान, ज्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे.त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ. खताळ यांनी केले आहे.