अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आणलेल्या निधीच्या कामांचे उद्घाटने करून कोपरगाव तालुक्यातसाठी एक रुपयाचाही निधी न आणता केवळ माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामांचे उद्घाटन करून फोटोसेशन करून फोटो सम्राट व खोटे नटसम्राट अशी नवी ओळख आमदार आशुतोष काळे यांनी केली.
अशी टीका जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्ह यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली. नुकतेच नगर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजित कार्यक्रमात सावळीविहीर ते कोपरगाव रस्त्याला १५० कोटींचा निधी मंजूर केला असून त्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा कोणताही संबंध नसून मी माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या पाठिंब्यामुळे मंजूर केला.
त्या कामाशी कोल्हे यांचा काहीही संबंध नाही, या आमदार आशुतोष काळे यांच्या वक्तव्यावर विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. कोल्हे म्हणाले, कोपरगाव पालिकेची निवडणूक आली म्हणून आमदार आशुतोष काळे यांची जीभ व पायाखालची वाळू घसरल्याने ते प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कोल्हे कुटुंबीयाविरुद्ध गरळ ओकत आहेत.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्याची जाहीर वाच्यता नगर येथे केली असे असतानाही कोपरगाव रस्त्यासाठी दीडशे कोटींच्या निधीचे श्रेय घेत आहेत.