कोपरगाव मतदारसंघात ६ कोटींची कामे होणार आमदार आशुतोष काळेंची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कोपरगाव मतदार संघाच्या विविध विकास कामांच्या ६ कोटींच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या असून ही कामे लवकरच होणार आहेत, अशी माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामे पूर्ण झाली असून अनेक कामे पूर्णत्वाकडे जात आहेत. उर्वरित विकास कामांना लवकरात निधी मिळून ही कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या अडचणी दूर करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.

आमदार काळे यांच्या पाठपुराव्यातून ६ कोटींच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये शिंगवे-कोपरगाव – पुणतांबा रस्ता ते पद्माकर सुराळकर घर रस्ता डांबरीकरण (१४.७७ लाख रुपये), वाकडी येथे श्रीखंडोबा देवस्थान परिसर सुशोभिकरण (३८.३० लाख), धोंडेवाडी पंचवटी हॉटेल ते थेटे वस्ती रस्ता बहादरपूर जवळके रस्ता डांबरीकरण (१४.८६ लाख),

डाऊच खुर्द महालक्ष्मी डेअरी ते रावसाहेब पवार घर रस्ता डांबरीकरण (१४.६० लाख), सुरेगाव येथे सामाजिक सभागृह बांधणे (१९.५३ लाख), वाकडी श्रीस्वामी समर्थ मंदिर ते नारायण खरात घर रस्ता डांबरीकरण (१४.३७ लाख), वाकडी श्रीसंत सावता महाराज मंदिर पेव्हर ब्लॉक बसवणे (११.५४ लाख), पुणतांबा चांगदेवनगर रेल्वे बोगदा ते गणपती मंदिर रस्ता डांबरीकरण (१७ लाख),

बहादराबाद जालिंदर कोल्हे वस्ती ते औताडे घर रस्ता (५०.०२ लाख), शिंगणापूर ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना पेट्रोल पंप मारुती मंदिर ते कर्मचारी वसाहतीपर्यंत रस्ता डांबरीकरण (२०.०४ लाख), देर्डे-को-हाळे येथील खडकी नदी ते राज्य मार्ग पर्यंत रस्ता (इजिमा-१) (३०.६१ लाख) आदी कामांचा समावेश आहे.

लवकरच या निविदा उघडल्या जावून सर्व तांत्रिक बाबींच्या पूर्तता होऊन काही दिवसात प्रत्यक्षात या विविध विकास कामांना सुरुवात होणार आहे, असेही आमदार काळे यांनी सांगितले, कोपरगाव शहर व मतदारसंघातील सर्व प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी ही कामे मार्गी लागतील.