अहमदनगर बातम्या

Ahmednagar Politics : आमदार बबनराव पाचपुते यांनी १०० कोटींचा निधी रस्त्यांसाठी आणला – खा. सुजय विखे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Politics : महायुती सरकारच्या काळातील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोरगरीब जनतेच्या तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत महसूल विभागात आमूलाग्र बदल केला असून,

आघाडी सरकारच्या काळातील महसूलमंत्र्यांनी सात वर्षांच्या काळात श्रीगोंदा तालुक्यातील जनतेची कामे न करता एकाच माणसाच्या घरी जाऊन भेट घेण्याचे काम केले असल्याची जोरदार टीका माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

श्री. संत शेख महंमद महाराज मंदिर परिसर सुशोभिकरण भूमिपूजन आणि श्रीगोंदा दुय्यम निबंधक कार्यालयाचा लोकार्पण तसेच विविध विकासकामांचा उद्घाटन सोहळा आ. बबनराव पाचपुते यांच्या हस्ते पार पडला. या वेळी अध्यक्षस्थानावरून खा. सुजय विखे बोलत होते. आ. प्रा. राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची इमारत ही राज्यातील तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली आधुनिक इमारत असून, या इमारतीच्या उभारणीत आ. बबनराव पाचपुते यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगितले.

महसूल विभागात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सरकारच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम केले असून, आगामी सहा महिन्यात स्टॅम्प पेपर विक्री बंद करून स्टॅम्प व्हेंडर यांना सरकार फ्रैंकिंग मशीन देऊन स्टॅम्प विक्रीत सुसूत्रता आणणार आहे, त्यामुळे गोरगरीब जनतेची लूट थांबणार आहे.

गुंठे वारीच्या नियमात बदल करणारे हे पहिले सरकार असून, या सरकारने २० गुंठयांपेक्षा कमी जमीन खरेदी-विक्री करण्याबाबत ठोस निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यां विहिरीसाठी १ गुंठा जमीन तसेच घरकुलासाठी लागणाऱ्या जागेची खरेदी अर्धा गुंठयापासून होणार असून, यासाठी लवकरच नवा कायदा येणार आहे.

मागील एक वर्षांत आ. पाचपुते यांनी १०० कोटींचा निधी रस्त्यांसाठी आणला. येत्या तीन महिन्यांत श्रीगोंदा नगरपालिका हद्दीतील प्रत्येक रस्ता काँक्रिट होणार असल्याचे खा. विखे यांनी बोलताना सांगितले.

कुकडीच्या इतिहासात यावर्षी श्रीगोंदा आणि कर्जतला दोनदा आवर्तन मिळाले आहे. शेतकरी सुधारणेच्या दृष्टीने सरकारने पाऊल उचलले असून, शेतकऱ्यांचा विमादेखील सरकारने भरला असून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या माध्यमातून मिळणार आहे.

आ. पाचपुते यांनी सांगितल्यानेच घोडचे आवर्तन सुटल्यामुळे घोडखालील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळले असल्याचे आ. प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. या वेळी युवा मोर्चाचे प्रदेश विक्रम पाचपुते यांचेही भाषण झाले.

आम्ही दिलेला शब्द पाळत असतो. सहा महिन्यापूर्वी संत शेख महमद महाराज मंदिर परिसर सुशोभीकरणसाठी निधी देण्याचे कबूल केले होते, त्यानुसार सुशोभीकरणसाठी एक कोटीचा निधी उपलब्ध केला असून, त्याचे भूमिपूजन करून कामही सुरू आहे.

काष्टी ते आढळगाव मार्गे जामखेड रस्ता, लिपणगाव येथे रेल्वे उडाणपुलासाठी निधी मंजूर केला. लोणीव्यंकनाथ येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी निधी मंजूर करून आणत उड्डाण पुलाचे काम सुरू केले असल्याचा खा. विखे यांनी आवर्जून उल्लेख केला

Ahmednagarlive24 Office