अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यंदाच्या वर्षी देखील पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे, यामुळे अनेकदा सीना नदीला पूर आला आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर शहरातील बोल्हेगाव जवळील पुलाची आमदार संग्राम जगतापांनी पाहणी केली. हा पूल सध्याच्या स्थितीला धोकादायक झाला आहे.
अनेक वर्षांचा असलेल्या पूल खराब झाला आहे. त्यामुळे या पुलावरुन होणारी शेतकरी, एमआयडीसीतील कामगार व बोल्हेगाव ग्रामस्थांची यांची सतत वाहतूक सुरू असते.
कुठलीही अनुसूचित घटना घडू नये, यासाठी या पुलाचे काम लवकरात लवकर करण्याचे आदेश आमदार जगतापांनी महापालिका प्रशासनाला दिले आहे.
तसेच या नदीवरील नवीन पूल बांधण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन लवकरात लवकर निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी iआ. संग्राम जगताप, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक अँड. राजेंद्र कातोरे, संभाजी पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पुलास कठडे नसल्यामुळे एखादा अनुसूचित प्रकार घडू नये. यासाठी या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी व या नदीवर नवीन पूल करण्यात यावा, ही बाब कुमारसिंह वाकळे यांनी जगताप यांच्या निदर्शनात आणून दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved