आमदार लहू कानडे म्हणतात सरपंचाने ठरवले, तर….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- सरपंचाने ठरवले, तर ग्रामपंचायत सर्व गरजूंना घरांसाठी जागा उपलब्ध करू शकते. तालुक्यात येत्या दोन वर्षांत कोणतेही कुटुंब बेघर राहणार नाही, यासाठी राज्य सरकारच्या महाआवास अभियानाला गती द्यायची आहे.

गरीबाला घर मिळवून देण्याची प्रामाणिक भावना ठेवून अधिकारी व ग्रामसेवकांनी प्रस्ताव तयार करावेत, असे आमदार लहू कानडे यांनी शुक्रवारी सांगितले. महाआवास अभियान ग्रामीण तालुकास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते.

तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, सभापती संगीता शिंदे, जि. प. सदस्य शरद नवले व संगीता गांगुर्डे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, तसेच सर्व ग्रामसेवक, सरपंच व उपसरपंच यावेळी उपस्थित होते.

आमदार कानडे म्हणाले, गट विकास अधिकारी, सर्व ग्रामसेवक व ग्रामपंचायतींनी गावातील जागांचे रेखांकन करुन लोकांचे ठराव करुन समितीकडे सादर करावेत.

सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प राज्य सरकारने केला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी योजनेतील अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण केले, असे त्यांनी या वेळी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24