अहमदनगर बातम्या

शेवगाव तालुक्यातून मला मोठे मताधिक्य मिळेल आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला विश्वास

Published by
Ajay Patil

शेवगाव तालुक्याची सत्ता गेली अनेक वर्ष घुले कुटुंबियांच्या भोवती फिरत असताना सुद्धा विकासापासून हा तालुका वंचित राहिला आज विभाजन झाल्यानंतर मी आमदारकीच्या माध्यमातून जी विकास कामे केली ती कामे मला मोठे मताधिक्य मिळवून देईल असा विश्वास आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केला.

काल सायंकाळी ढोर जळगाव येथे झालेल्या सभेत त्या बोलत होत्या सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भीमराव फुंदे हे होते. यावेळी प्रथम गावातील श्रीराम मंदिराचे दर्शन घेऊन ग्रामस्थांनी मोठी मिरवणूक काढली यावेळी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आले ढोल ताशांच्या गजरात आमदार राजळे यांचे स्वागत झाले यावेळी झालेल्या सभेत महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आमदार राजळे यावेळी म्हणाल्या की ज्यांनी या भागाचे लोकप्रतिनित्व केले आहे ते लोक हिरवी तर कधी फिरकलेच नाही मात्र निवडणुकीच्या वेळीही लोकांना मते मागण्यासाठी ते येत नाही याचा अनुभव मी शेवगावच्या संपूर्ण तालुका दौऱ्यात घेतला आहे मी प्रत्येक गावात गेले अनेक गावांमध्ये मला त्यांची कमालीची दहशत दिसून आली कित्येक गावात मी प्रश्न विचारले तुमच्या गावात मागच्या प्रतिनिधींनी काय केले तुम्हाला पंचायत समिती सदस्य माहित आहे का तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य माहित आहे का तानिकांचे उत्तरे मला मिळाली त्यातूनच नेमके त्या मंडळींनी काय काम केले ते किती लोकात आहे याचे दर्शन घडले

मला जो कार्यकाल आजपर्यंत मिळालेला आहे त्यावेळी कोणताही दुजाभाव न करता मी दोन्ही तालुक्याला समान न्याय देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे मागच्या निवडणुकीमध्ये तर मला लोक समोर यायला घाबरत होते पण आज गावागावात माझा सत्कार होतो अनेक युवक मंडळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात यातूनच मला माझ्या कामाची पावती मिळाली याचे मला समाधान आहे जसे पेराल तसे उगवते ही शिकवण आमच्या घराण्याने दिली आहे

आजपर्यंत आम्ही कोणत्याही गाव पातळीवरील निवडणुकीत सहभागी होत नाही कारण ती निवडणूक ही काही काळापुरते मर्यादित असते ते निवडणूक झाले की गावात गावांनी एकत्र यायचं असतं आणि गावाचा विकास करायचा असतो मी माझ्या आजपर्यंतच्या कार्यकाळामध्ये एकही दिवस करीना थांबता सातत्याने मतदारसंघात फिरले आहे ज्या ठिकाणी जे जे देता येईल त्याच्या गावांमध्ये विकासाचे कामे दिली आहेत याही पुढे संधीच सोन करायला आणि प्रत्येक गावाचा राहिलेला विकास करायला मी कटिबद्ध आहे.

ज्या शासनाकडून ज्या नेत्यांकडून निधी मिळवला त्याच नेत्यांच्या विरोधात जाऊन अपक्ष निवडणुकीला उभे राहिलात याची गरज होती का याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे आपल्या अस्तित्व जिवंत राहावे म्हणून निवडणूक लढवायची नसते.

आपल्याजवळ स्वतःचा अजिंठा नाही त्यामुळे दुसऱ्याच्या कामा विषय गैरसमज निर्माण करायचे हे उद्योगास विरोधी मंडळी करत आहेत जनता सुज्ञ आहे ती वीस तारखेला त्यांच्या मनातलाच आमदार करणार आहे त्यामुळे जरी आज माझ्यासमोर अनेक मंडळी आली नसली तरी त्यांचे निरोप माझ्यापर्यंत आले आहेत यातच मी माझे यश समजते.

यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी कार्यकारिणीचे किसान सेलचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर म्हणाले की या तालुक्यात घराणेशाही विरुद्ध गेल्या अनेक वर्ष आम्ही संघर्ष केला आहे या घराण्याने काय केले आहे याची कल्पना शेवगावकरांना आहे मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वामुळे या भागातील आमच्यासारख्या संघर्षमय कार्यकर्त्यांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे आणि त्यांनीही शेवगाव तालुक्यातील प्रत्येक गावात गावाच्या मागणीनुसार जे जे देता येईल ते दिला आहे.

पाण्याचा प्रश्न पूल घरकुल योजना एवढेच नव्हे तर आपल्या लाडक्या बहिणीसाठी जी शासनाची योजना होती ती योजना राबवण्यामध्ये पुढाकार घेतला अशी बहिण आम्हाला लाभली ह्या मी आमचे भाग्य समजतो आणि शेवगाव तालुका हा पाथर्डी तालुक्याच्या पुढे राहील असा विश्वास देतो.

यावेळी भीमराव फुंदे यांनी आप्पासाहेब राजळे माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे आणि मोनिकाताई राजळे यांच्या कार्यपद्धतीची तुलना करून मोनिकाताई शांत संयमी मात्र कृतिशील नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाची या तालुक्याला गरज आहे त्यामुळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आव्हान केले.

यावेळी अनेक महिला भगिनींनी त्यांचा सत्कार केला यावेळी सभेस शेतकरी संघटनेचे नेते बापूसाहेब भोसले यांच्यासह……. अनेक मान्यवर उपस्थित होते.आमदार मोनिकाताई राजळे यांनी सलग सात दिवस शेवगावच्या प्रत्येक तालुक्यातील गावांना यावेळी भेटी देऊन मतदान करण्याचे आव्हान केले यावेळी स्थानिक उमेदवार सुद्धा आजपर्यंत त्या गावात पोहोचलेले दिसले नाही असे बापूसाहेब पाटेकर यांनी सांगितले.

Ajay Patil