आमदार निलेश लंके झाले आक्रमक म्हणाले महिलांना मारहाण करणे कोणत्या कायद्यात बसते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- मोठे व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करत भाजीपाला विकणाऱ्या महिलांना मारहाण करत त्यांचे वजनकाटे जप्त करणाऱ्या टाकळी ढोकेश्वर पोलिस दूरक्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आमदार नीलेश लंके यांनी शनिवारी संध्याकाळी चांगलेच फैलावर घेतले.

नगर-कल्याण मार्गावर टाकळी ढोकेश्वर येथील बाह्यवळण मार्गावर वासुंदे चौकात भाजीपाला विकणाऱ्या महिलांना मारहाण करत पोलिसांनी त्यांचे वजनकाटे जप्त केले. ही माहिती एका महिलेने आमदार लंके यांना कळवली.

ते तातडीने वासुंदे चौकात आले, पण तोपर्यंत पोलिस निघून गेले होते. त्यांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावले. पोलिस आले, त्यावेळी चौकातील काही दुकाने उघडी होती. संतप्त झालेल्या लंके यांनी पोलिसांना चांगलेच फैलावर घेतले.

कारवाई करण्याबाबत दुमत नाही. मात्र, बड्या व्यापाऱ्यांना, हॉटेल व्यावसायिकांना एक न्याय व गोरगरीब भाजीविक्रेत्यांना एक न्याय ही बाब खपवून घेतली जाणार नाही.

किराणा, कापड दुकाने अर्धे शटर उघडे ठेवून, मागच्या दाराने उशिरापर्यंत सुरू असतात. हॉटेल व्यावसायिक अवैध व्यवसाय करतात. रात्री उशिरापर्यंत सुरू असतात.

त्याकडे मात्र पोलिस हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतात. महिलांना मारहाण करणे कोणत्या कायद्यात बसते, असे सवाल उपस्थित करत आमदार लंके यांनी गोरगरीब जनतेवर कायद्याचा बडगा उगारताना संयम ठेवा,

अन्यथा मलाही तोंड उघडावे लागेल, असा इशारा दिला. टाकळी ढोकेश्वर येथे पोलिसांनी केलेल्या मारहाणीची तक्रार आमदार नीलेश लंके यांच्याकडे करताना भाजी विक्रेती महिला.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24