अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा आणि पंढऱपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदावर वर्णी लागण्यासाठी राजकीय मंडळींकडून फिल्डिंग लावण्यात येत आहे.
दरम्यान या पदाबाबत आमदार लंके यांचे ही नाव जोडण्यात येत आहे,याबाबत आमदार निलेश लंके यांनी स्पष्टीकरण दिले आहे, वडगाव आमली येथे विविध विकास कामांचा आ. लंके यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
शिर्डी संस्थानची ख्याती देशभरासह जगात असुन अध्यक्षपदामध्ये मला कोणत्याही प्रकारचे स्वारस्य नाही.
शिर्डीच्या साईबाबांप्रमाणे मी ही फकीर मग अध्यक्ष होऊन पापाचा धनी कशासाठी होऊ? असे म्हणत आमदार नीलेश लंके यांनी शिर्डी संस्थांनच्या अध्यक्षपदावर पडदा टाकला आहे.
शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदावर काम करत असताना माझी व मतदारसंघातील खासगी कामे करावी लागणार आहे. त्यामुळे हे पाप माझ्याने होणार नसल्याने या संस्थानच्या अध्यक्षपदाच्या चर्चेला आमदार नीलेश लंके यांनी पुर्णविराम दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे कुठल्याही विकासकामांचा नारळ फोडताना दिसला नाही परंतु आमदार नीलेश लंके यांनी कोरोना दाह कमी झालेला लक्षात येताच शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर भाळवणी येथे पूर्ण वेळ देत असताना
मोठ्या प्रमाणात निधी मतदारसंघात खेचून आणला आहे. त्या विकास कामांचे भूमिपूजन मतदारसंघात पार पडत आहे. सोमवारी वडगाव आमली येथे उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी आमदार लंके यांनी वडगाव आमली ग्रामस्थांबरोबर मुक्त संवाद साधला.
दरम्यान बोलताना आमदार लंके यांनी कोरोनाकाळात अनुभवलेल्या वाईट घटना, कोरोनामधील धक्कादायक आठवणी सांगत माझे सहकारी मित्र,
नातेवाईक व अनेक सर्वसामान्य जनतेच्या कोरोना काळातील दु:खद घटनांच्या आठवणीने इतका भयानक प्रकार अनुभवला हे सांगताना आमदार लंके भावनिक झाले होते.