Ahmednagar News : जिवा भावाचे सहकारी असतील तर पैसे कशाला लागतात, असा सवाल करतानाच बिगर पैसेवाल्यामुळे पैसेवाल्याला घाम फुटलाय.
पैसेवाले फार आहेत. पैसेवाल्यांना घाबरत नाहीत, बिगर पैसेवाल्यामुळे त्यांना झोपही लागत नाही, असे सांगत आमदार नीलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
नीलेश लंके प्रतिष्ठाणच्या वर्धापनदिनानिमित्त कामोठे येथे आयोजित स्नेहमेळाव्यात आ. नीलेश लंके यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी पारनेर-नगर मतदारसंघातील नागरिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
लंके पुढे म्हणाले, चार साडेचार वर्षापूर्वी तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने मला आमदारकीची संधी मिळाली. त्या संधीचे सोने करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. मी भाग्यवान आहे, मला जीवा भावाचे सवंगडी मिळाले.
माझ्या आई-वडिलांप्रमाणेच जीवापाड प्रेम करणारे सहकारी मला मिळाले. मी साठ हजार मतांच्या फरकाने विजयी झालो, त्याचे श्रेय मुंबईकरांना जाते, असे लंके यांनी सांगितले.
मेळाव्यास कामोठे येथील विद्यलयाच्या प्रांगणामध्ये विक्रमी गर्दी झाली होती. सर्व खुच्या महिलांनी व्यापल्याने पुरूषांना उभे राहूनच मेळाव्यात सहभाग नोंदवावा लागला. सुप्याहून रॅलीने निघालेल्या आ. नीलेश लंके यांचे शिरूरपासूनच मोठया उत्साहाने स्वागत करण्यात येत होते. कामोठे येथे पोहचल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात व फटक्यांच्या आतषबाजीत आ. लंके यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
राजयोग असेल तर…
राजकारणात काय व्हायचे ते होईल. बऱ्याच लोकांनी तर्कवितर्क काढले. २०२४ चे रणशिंग मुंबईमधून फुंकणार. लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा करणार. राजकारण सुरू असते. समयसे पहिले और भाग्यसे अधिक किसीको कुछ नही मिलता. राजयोग असेल तर झोपेत असेल तरी मिळेल.
काहींनी रात्रंदिवस आपटली तरी काहीच होत नाही. हे महत्वाचे आहे. काय व्हायचे ते होईल. एव्हडे मिळाले तेच बोनस मिळाले आहे. मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते की, ग्रामपंचायत सदस्य होईल. आमदार झालो, साडेचार वर्षे झाले तरी आजही विश्वास बसत नाही, आमदार आहे म्हणून. ही सगळी तुमची कृपा असल्याचे लंके म्हणाले
या वेळी राणीताई लंके, सुदाम पवार, बाबासाहेब तरटे, बाळासाहेब खिलारी, बापू शिर्के, कारभारी पोटघन, राहुल झावरे, दिपक आण्णा लके, दादा शिंदे, जितेश सरडे, श्रीकांत चौरे, पारनेर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, सुभाष कावरे, पुनम मुंगसे, राजेश्वरी कोठावळे, सुवर्णा घाडगे, उमाताई बोरूडे, अशोक घुले, नाना करंजुले, अभयसिंह नांगरे,
कैलासशेठ धाडगे, अर्जुन भालेकर, संभाजी रोहोकले, नितीन अडसुळ, नंदकुमार देशमुख डॉ. कावरे, सुनील काळभोर, बाळा पुंडे, अर्जुन डांगे, चंद्रकांत नवले, स्वप्नील चौधरी, भाऊ पावडे, नितीन चिकणे, गोपीनाथ पठारे, कैलास पावडे, आहेर सर, प्रसाद नवले, दिनेश घोलप, निलेश शिंदे, स्वप्निल चौधरी, संदीप चौधरी, आर. आर. राजदेव, निवृत्ती गाडगे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते.