आमदार राधाकृष्ण विखे यांचे राज्यपालांना साकडे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- अतिवृष्टीने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेऊन मदतीच्या निकषात बदल करावेत आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करण्याचे निर्देश आपण सरकारला द्यावेत,

आशी विनंती भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी राज्यपालांना केली. मुंबई येथे राजभवनात आमदार विखे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली

आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाचे गांभीर्य लक्षात आणून देत सरसकट मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत जमा करण्याची मागणी केली.

मागील काही दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसाने रब्बी हंगामातील पेरण्या वाया गेल्या. शेतात उभी असलेली पिक जमीनदोस्त झाल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून,

दुहेरी संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यावर आल्याचे विखे यांनी सांगितले. सोयाबीन, कापूस, कांदा, भाजीपाला यांसह उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात बाधित झाल्याने साखर कारखान्यांना समोरही गाळपाचे आव्हान आहे.

अहमदनगर Live24 

च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24