शेतकऱ्यांसाठी आमदार राजळे उतरणार रस्त्यावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्हावासीयांना झोडपले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपच्या शेवगाव- पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या वर्षीचा खरीप हंगामच शेतकऱ्यांचा वाया गेला असून सरकारने या सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई दिली नाही तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही,

असा सूचक इशारा आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिला आहे. पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथील पाझर तलाव तब्बल १९ वर्षांनी पाण्याने तुडुंब भरला असून

या पाण्याचे जलपूजन आमदार राजळे यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24