अहमदनगर बातम्या

आमदार रोहित पवार आक्रमक ! राज्य सरकारला केली ‘ही’ विनंती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- सरकारी भरतीसाठीच्या एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे.

शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. असं कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.

आरोग्य विभागाच्या क आणि ड वर्गाच्या परीक्षेत सलग दुसऱ्यांदा परीक्षेचे नियोजन दिलेल्या ‘न्यासा’ संस्थे कडून गोंधळ उडाल्याची बाब समोर आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दोष ‘न्यासा’या खाजगी संस्थेचा असला तरी या परस्थितीत जनतेत सरकारबद्दल राग निर्माण होत असल्याने आ.रोहित पवार यांनी याबाबतचे आपले संताप व्यक्त करत मत व्यक्त करत अनेक मागण्या केल्या आहेत. याबाबत आ.रोहित यांनी फेसबुक,

ट्विटर वरून सरकारला धारेवर धरत मागण्या मांडत त्या तातडीने अंमलात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आ.रोहित पवार म्हणतात, एकाच दिवशी दोन परीक्षांसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागणार आहे.

शासनाने परीक्षा घेणाऱ्या कंपनीला संबंधित अडचण सोडवण्याचे निर्देश तत्काळ द्यावेत आणि मदत केंद्र सुरू करून परीक्षार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र रिअलोकेट करावेत. तसंच कोणत्याही परिस्थितीत ही परीक्षा पुढं ढकलू नये.

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी फी न घेता प्रत्येक परिक्षार्थ्याकडून एकाच पदाची फी घ्यावी.शिवाय पहिल्या वेळी परीक्षा रद्द झाल्याने आता सर्व परीक्षार्थींना परीक्षेला जाण्यासाठी एसटीचा प्रवास मोफत करायला हवा.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24