अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र सरकार विरुद्ध बिहार सरकार असा संघर्ष गेल्या काही दिवसापासून सुरु आहे. या संघर्षाला बिहार विधानसभा निवडणुक कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
जशी निवडणूक जवळ येत आहे तसं महाराष्ट्रातील राजकारण देखील तापू लागलं आहे. आता विषयावर राष्ट्रवादीचे युवा नेते कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.
भाजपकडून यासाठी वातावरण पेटविले जात असल्याचा आरोप होत असताना आता राष्ट्रवादीचे युवा नेते कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बिहार सरकारला लक्ष केलं आहे.
बिहारी युवकांच्या चिकाटीचे कौतुक करताना त्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ न शकल्याबद्दल बिहारी नेत्यांवर पवार यांनी टीका केली आहे.
‘भूमिपुत्रांसाठी नोकऱ्या निर्माण करण्याची जी ताकद महाराष्ट्राच्या नेत्यांमध्ये आहे, ती बिहारच्या नेत्यांमध्ये का नाही,’ असा सवाल त्यांनी केला आहे. बिहाराच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील घडामोडींचा वापर केला जाणार हे, आता स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुद्दा यासाठीच पेटविण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. लॉकडाउनच्या काळात बिहारला गेलेले
स्थलांतरित कामगार आता पुन्हा महाराष्ट्रात परतू लागल्याकडे लक्ष वेधत रोहित पवार यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यांनी बिहारी युवकांना साद घातली आहे.
ते म्हणतात, गावी परतल्यानंतर निराशाच वाट्याला आल्याने या मजुरांनी पुन्हा महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याची वाट धरल्याचे दिसून येत आहे.
करोनाच्या काळात बिहारमधील स्थलांतरीत कामगारांची महाराष्ट्राने कशी काळजी घेतली याच्या अनेक बातम्या, व्हिडिओ आपण पाहिले आणि हेच लोक बिहारमध्ये गेल्यानंतर त्यांचे कसे हाल झाले हेही पाहिलं,
तरीही हेच लोक याबाबत मात्र काही बोलत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. बिहारच्या कायदा-सुव्यवस्थेबाबत वर्तमानपत्रात अनेक रकानेच्या रकाने भरुन
बातम्या मी वाचल्या आणि इथलेच राजकारणी इतर राज्यातील पोलीस यंत्रणेबाबत जेव्हा बोलतात तेव्हा हसू येतं, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved