आमदार रोहित पवार पोहचले ग्रामदेवतेच्या दर्शनास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

राज्यभरातील मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. यातच कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार यांनी कर्जतच्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले.

पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांचे दरवाजे भक्तासांठी पुन्हा उघडल्यानंतर रोहित पवार यांनी गोदड महाराजांचे दर्शन घेतले. जनतेवरील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी रोहित पवारांनी ग्रामदेवतेला साकडं घातलं.

मंदिर उघडण्यास केव्हा परवानगी मिळेल, याकडे भाविकांसह नागरिकांचे लक्ष लागले होते. आता पाडव्यापासून मंदिर उघडण्यात आले असल्याने अर्थकारणाची घडी देखील रुळावर येण्यास हळूहळू सुरुवात होणार आहे दरम्यान मंदिराचे दार आज सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आले.

राज्य सरकारचे मी आभार मानतो. कोरोनाच्या काळात गेल्या आठ महिन्यात आरोग्याचा विषय महत्वाचा होता, त्यामुळे अनेक अडचणी होत्या.

लोकांनी एकत्र आल्यानंतर अनेक अडचणी वाढू शकतात. मात्र भाविकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.

आ.पवार यांनी कर्जतचं ग्रामदैवत सद्गुरु संत गोदड महाराज, राशीनला जगदंबा देवी आणि सिद्धटेकला गणरायाची भाविक आणि कार्यकर्त्यांसह मनोभावे पूजा आणि आरती केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24