आमदार रोहित पवार म्हणाले… निवडणुका बिनविरोध करा आणि 30 लाख मिळवा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-हे. गाव पातळीवर असणारे सर्व मतभेद, गट तट, राजकीय द्वेष, बाजूला सारून गावाच्या विकासासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी.

अन् गावच्या विकासासाठी आपल्या गावांना ३० लाखांचा विकासनिधी घ्या, अशी साद राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड तालुक्यातील निवडणुक कार्यक्रम लागलेल्या गावांतील नागरिकांना घातली आहे.

कर्जत तालुक्यातील सुमारे ५६ तर जामखेड तालुक्यातील ४९ गावांच्या ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

त्या अनुषंगाने आ.रोहित पवारांनी ही घोषणा केली आहे. बिनविरोध निवडणुका पार पाडलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींना सी.एस.आर. फंडाच्या माध्यमातूनही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे आ.पवार यांनी बोलताना सांगितले. बिनविरोध निवडणूक’ ही प्रक्रिया गावच्या हिताची ठरणार आहे.

त्यामुळे ही साद साहजिकच बिनविरोध निवडणुका पार पाडणाऱ्या गावांसाठी विकासाच्या दृष्टीने फायद्याची असुन अनेक ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी सर्वच सुजाण नागरिक प्रयत्नशील असतील असा विश्वास आ.पवार यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24