आमदार रोहित पवार म्हणाले भाजपाची डाळ इथे शिजणार नाही !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : भाजपा देशातील इतर राज्यांमध्ये विरोधी पक्षाची सरकारे पाडत असून, तसा प्रयोग त्यांनी महाराष्ट्रातही करण्याचे प्रयत्न चालविलेले आहेत.

मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते अनुभवी आणि हुशार आहेत. त्यामुळे भाजपाची डाळ इथे शिजणार नाही. हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाल यशस्वीपणे पूर्ण करील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना योद्ध्यांच्या मदतीसाठी साहित्य वाटपासाठी आ. पवार हे नगर शहरात आले होते, त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हे सरकार लोकहिताचे सरकार असून, अडचणीच्या काळातही चांगले काम करत आहे.

केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. तरीही सरकार खंबीरपणे काम करत आहे.

या कोरोना संकटाच्या काळात केंद्राने आणि राज्याने जनतेच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. या काळात राजकारण करणे चुकीचे असल्याचेही ते म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24