105 आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून भाजपचे नेते असं वक्तव्य करतात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अभ्यासू वृत्ती तसेच जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे कर्जत – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहतात.

नुकतेच रोहित पवार यांनी भाजपनेते रावसाहेब दानवेंना चांगलाच शाब्दिक टोला लगवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षाच्या सरकारला 12 महिने पूर्ण झाले तरी यांचे 3 महिने काही संपेना’,अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समाचार घेतला आहे.

ते आज औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या प्रचारासाठी रोहित पवार आज जालन्यात होते. निवडणुकीच्या काळात यांनी भरमसाठ पैसा खर्च केला आणि कोरोनाच्या काळात घरात बसायचं.

ही भाजपची विचारसरणी आहे, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे. बारा महिने झाले तरी यांचे तीन महिने संपणार नाहीत. फक्त आपले 105 आमदार कुठे जाऊ नयेत म्हणून भाजपचे नेते असं वक्तव्य करत असल्याचं, रोहित पवार म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24